नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू व सध्या खासदार असलेल्या गौतम गंभीरने खळबळजनक खुलासा केला आहे.
२०११ मध्ये झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कर्णधार महेंद्रसिंह धोनीमुळे माझं शतक हुकलं, असं वक्तव्य गंभीरने केलं आहे.
यावेळी गंभीर म्हणाला की, तेव्हा श्रीलंकेने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करण्याचा एकमेव विचार माझ्या मनात असल्याने मी ९७ धावांवर पोहोचेपर्यंत वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला नव्हता. तीनच धावा बाकी आहेत. तीन धावा काढ म्हणजे तुझं शतक पूर्ण होईलं, असं धोनीने मला ती ओव्हर संपल्यावर सांगितले.
धोनीच्या ह्या सल्ल्यामुळे माझे लक्ष विचलित झाले. आधी टार्गेटकडे असलेले लक्ष कायम ठेवले असते तर माझें शतक पूर्ण झालं असते. मी आऊट झाल्यावर माघारी परतताना माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं. त्या तीन धावा आता मला आयुष्यभर छळत राहणार आहे.
दरम्यान, गंभीरने केलेल्या या धक्कादायक खुलाशानंतर आता धोनी- गंभीर असा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.