धोनीची खेळी,”जीवा” च्या जिवावर……

रांची, १० ऑक्टोबर २०२० : हाथरस,रांका या सारख्या प्रकरणातून देश सावरत असतानाच क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक वृत्त समोर आले.भारतीय क्रिकेट विश्वाला एका वेगळ्या स्थानावर घेऊन जाणारा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी यांच्या पाच वर्षाच्या मुलीला सोशल मिडियावरून बलात्काराची धमकी देण्यात आली आहे.आयपीएल मधे धोनी चांगला खेळत नाही म्हणून हि धमकी देण्यात आली.

ज्या देशात स्त्रीला देवी म्हणून पुजा होते.त्याच देशात बलात्काराचा घटना रोज घडत आहेत.काही नराधमांनी तर जणू राक्षसाचेच रूप घेतले आहे.धमकी,विनयभंग अशा घटना आता गुन्हेगारांना क्षुल्लक वाटू लागल्यात की काय?असा प्रश्न उपस्थित होतय.आपण काय करतोय,काय बोलतोय याची साधी जाणीव देखील त्यांना नाही.या ५ वर्षाच्या मुलीला दिलेल्या धमकीमुळे आज पुन्हा एकदा देशात माणुसकीची हत्या झालीये.

सोशल मिडिया हे जितके लोकांना जवळ आणण्याचे माध्यम आहे.त्या पेक्षा दुप्पट वेगाने यावर गुन्हे घडतायत.सोशल मिडियाचा चांगला वापर कमी आणि गैरवापर मोठ्या प्रमाणात होतोय.त्यामुळे सरकारने याची गंभीर दखल घेत या माध्यमांवर ठोस पाऊले उचलण्याची गरज आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा