६ ते १२ वयाच्या लहान मुलांना ही होऊ शकतो मधुमेह, घ्या हि काळजी…..

पुणे, ४ फेब्रुवरी २०२१: हल्ली जीवनमान फार बदलले आहे. त्यात लहान मुलांचे आयुष्य ही काळानुसार पुर्ण बदलून गेलं आहे. पण, ते त्यांच्या आरोग्यासाठी कितपत योग्य आहे? याचा विचार करणे गरजेचं आहे. आज लहान वयातच मुलांना अनेक गोष्टी दिल्या जातात. म्हणजे त्यांना सहजरीत्या उपलब्ध करून दिल्या जातात. पण, त्या वस्तूचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याकडे फार कमी पालक लक्ष देतात.

लहान मुलांचे खेळणं, सकस आहार घेणं आणि त्यांची झोप ही आजच्या काळात खूप गरजेची असते. प्रत्येक लहान मुलांना कमीत कमी १० ते १२ तास झोप मिळायलाच हवी. आजच्य काळातील लहान मुलांना वेळेवर झोप मिळाली नाही तर त्यांचे शरीर अनेक घातक आजारांना निमंत्रण देते. ज्या बद्दल आपण आज जाणुन घेणार आहोत.

एका संशोधनानुसार ६ ते १२ वयोगटातील मुलांना ९ ते १२ तासांची झोप मिळणं आवश्यक आहे. मुलांना योग्य प्रमाणात झोप नाही मिळाली तर त्यांना लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि डिप्रेशन या समस्या उद्भवतात. यामुळे मुलांना टाईप २ चा मधुमेह होण्याची शक्यता आसते. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्वाचं आसतं.

जेव्हा लहान मुलांच्या झोपेच्या वेळेत वाढ होते, तेव्हा शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. शिवाय शरीरात इन्सुलिन देखील योग्य प्रमाणात आढळून येते. तेव्हा टाईप २ च्या मधुमेहाचा धोका कमी होतो. त्यामुळं प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा