२४ तासात राज्यात १२१६ नवीन रुग्णांचे निदान

पुणे, दि. ८ मे २०२०: राज्यात कोरोनाचे ३३०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आज सकाळ पर्यंत १२१६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्ण १७ हजार ९७४ झाले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात गेल्या २४ तासात कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३०१ रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,०२,१०५ नमुन्यांपैकी १,८३,८८० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १७,९७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,१२,७४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३,४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील विविध रुग्णालयात भरती असलेल्या ८,८१६ रुग्णांचे त्यांच्या लक्षणाच्या तीव्रतेनुसार विश्लेषण केले असता पुढील निष्कर्ष समोर आले आहेत:

●या एकूण भरती रुग्णांपैकी ५२२८ ( ५९ टक्के) रुग्ण हे लक्षणे विरहित आहेत. ●३२०९ (३६ टक्के) रुग्ण हे सौम्य ते मध्यम लक्षणे असणारे आहेत. तर
●४२४ ( ५ टक्के) रुग्ण हे गंभीर स्वरुपाचे असून त्यातील २३६ ( ३ टक्के) रुग्ण ऑक्सिजनची आवश्यकता असणारे आहेत तर ९२ (१ टक्के) रुग्णांना व्हेंटीलेटरची आवश्यकता लागलेली आहे. उर्वरित ९६ रुग्ण इतर कारणांमुळे अतिदक्षता विभागात भरती आहेत. गेल्या २४ तासात राज्यात ४३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६९४ झली आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २४, पुण्यातील ७, वसई विरार मध्ये ५, सोलापूर शहरात २, अकोला शहरात १, पालघरमध्ये १ आणि औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे.

याशिवाय मणिपूरमधील १ आणि बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ४३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २५ रुग्ण आहेत तर १४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ४३ रुग्णांपैकी २९ जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६९४ झाली आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील:
(कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ११,३९४ (४३७)

ठाणे: ९३ (२)
ठाणे मनपा: ६५० (८)

नवी मुंबई मनपा: ६५९ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: २६३ (३)

उल्हासनगर मनपा: १४

भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)

मीरा भाईंदर मनपा: १८९ (२)

पालघर: ४६ (१)

वसई विरार मनपा: १८७ (९)

रायगड: ७६ (१)

पनवेल मनपा: १२५ (२)

ठाणे मंडळ एकूण: १३,७१७ (४७२)

नाशिक: ४७

नाशिक मनपा: ५४

मालेगाव मनपा: ४३२ (१२)

अहमदनगर: ४४ (२)

अहमदनगर मनपा: ०९

धुळे: ८ (२)

धुळे मनपा: २४ (१)

जळगाव: ६४ (११)

जळगाव मनपा: १४ (२)

नंदूरबार: १९ (१)

नाशिक मंडळ एकूण: ७१५ (३१)

पुणे: १०५ (४)

पुणे मनपा: १८९९ (१२२)

पिंपरी चिंचवड मनपा: १२५ (३)

सोलापूर: ६

सोलापूर मनपा: १७७ (१०)

सातारा: ९४ (२)

पुणे मंडळ एकूण: २४०६ (१४१)

कोल्हापूर: १० (१)

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३२

सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)

सिंधुदुर्ग: ४ (१)

रत्नागिरी: १६ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ७१ (३)

औरंगाबाद:३

औरंगाबाद मनपा: ३९७ (१२)

जालना: ८

हिंगोली: ५८

परभणी: १ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ४६८ (१३)

लातूर: २५ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ३

नांदेड मनपा: २९ (२)

लातूर मंडळ एकूण: ६१ (३)

अकोला: ९(१)

अकोला मनपा: ९० (९)

सदर आकडेवारीही सातत्याने बदलत असते दिलेली ही माहिती गेल्या चोवीस तासातील आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा