मुंबई, १५ ऑक्टोंबर २०२०: ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारनं गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला. जलयुक्त शिवार योजनेतील गैरकारभाराबाबत ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर आता या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. यावर चिमटा काढत या योजनेमुळं ‘शिवार’ खरंच जलयुक्त झालं की फक्त पाण्याऐवजी पैसेच मुरले?, हे आता स्पष्ट होईल, असं रोहित पवार यांनी म्हटलंय.
कॅग’नं या प्रकल्पावर ताशेरे ओढल्यानंतर आता या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं बुधवारी घेतला. मात्र राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयावर विरोधकांकडून व विरोधी पक्षाकडून टीका होताना दिसत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवत आपल्या ट्विटर अकाउंट वरून भाजपवर निशाणा साधला आहे.
“जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल,” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीमुळं भाजप पेचात सापडण्याची शक्यता आहे. यापूर्वी ‘कॅग’च्या अहवालातही जलयुक्त शिवार योजनेवर ताशेरे ओढण्यात आले होते. अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यात जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरली, असं ‘कॅग’नं म्हटलं होतं. त्यामुळं आता एसआयटी चौकशीत आणखी काय माहिती पुढं येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे