गोल पोस्ट स्पॉटलाइट “बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ?” उर्मिला ची कंगना वर...

“बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ?” उर्मिला ची कंगना वर टीका

मुंबई, ३० डिसेंबर २०२०: काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार वर बे लगाम टीका करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत काल मुंबईत आली होती. दरम्यानच्या काळात तिने मुंबईची तुलना पाकिस्तान सोबत देखील केली होती. यावेळी तिने हिंदू-मुस्लीम भावना दुखावल्या जातील अशी बरीच वक्तव्य केली होती. यानंतर ती पुन्हा एकदा माया नगरीमध्ये परतली आहे. मंगळवारी तिने मुंबादेवी व श्री सिद्धिविनायक मंदिरांना भेट दिली. काही दिवसांपूर्वीच तिने मुंबईविषयी अपशब्द काढले होते तर राज्य सरकारची तुलना तालिबानशी केली होती.

कंगनाने ट्विट केले की, “मला माझ्या प्रिय शहर मुंबईसाठी उभे राहण्यासाठी मला एवढ्या विरोधाचा सामना करावा लागेल असे वाटले नव्हते. आज मी मुंबा देवी आणि श्री सिद्धिविनायक ह्या देवळांना भेट दिली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. आता मी सुरक्षित आहे. प्रेमाने भरभरून पुन्हा स्वागत झाल्यासारखे वाटत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. “

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ..

नुकतीच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कंगनाच्या या वक्तव्याला उत्तर देत आपल्या ट्विटर हँडलवरून मराठीत ट्विट केले, त्या म्हणाल्या की, “बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ ??” कंगना आणि उर्मिला यांच्यात सप्टेंबरमध्ये मुंबईची पाकिस्तानशी तुलना केल्यावरून वाद निर्माण झाला होता. मुंबई आणि बॉलिवूडमध्ये ड्रग्जच्या वापराविषयीच्या टिप्पण्यांसाठी उर्मिलाने कंगनावर जोरदार हल्ला केला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version