न्यूयॉर्क, १३ एप्रिल २०२३ : रोबोट्स हळूहळू लोकांच्या जीवनाचा एक भाग बनत आहेत. लहान मुलांच्या खेळण्यांपासून ते कारखान्यांमधील वर्कस्टेशन्सपर्यंत आपण रोबोट्स बघू शकतो. न्यूयॉर्क पोलिस डिपार्टमेंटमधे पूर्वी अश्याच एका रोबो कुत्र्याचा समावेश केला गेला होता, परंतु त्यावेळी या रोबोचा गोपनीयतेला धोका असल्याचे म्हटले होते. परंतु अमेरिकेचे पोलीस पुन्हा एकदा रोबोट डॉग (डिजिडॉग) वापरण्यास सुरुवात करणार आहेत.
न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन डिजीडॉगची पोलिसांमध्ये पुन्हा सक्रीय करण्याची घोषणा केली. हा रोबो डॉग लोकांचे प्राण वाचवण्यास मदत करतो. रिपोर्ट्सनुसार, बोस्टन डायनॅमिक्सने डिझाइन केलेला हा डिजिडॉग ‘स्पॉट’ म्हणून ओळखला जातो.
न्यूयॉर्क शहर पोलीस विभाग (NYPD) लोकांच्या भल्यासाठी या डिजिडॉगला पोलिस डिपार्टमेंट मधे भरती करणार आहेत. हा डिजीडॉग संकटाच्या वेळी धोकादायक भागात किंवा गस्तीच्या भुयारी मार्गांवर आणि बांधकाम साइट्सवर लक्ष ठेवण्यासाठी मानवांना मदत करू शकतो. लोकांशी संवाद साधण्यासाठीही त्याची रचना करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी : केतकी कालेकर