दिली होती सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर: पवार

मुंबई : गेल्या महिनाभरात राज्यात सरकार स्थपणेवरून ज्या नाट्यमय घडामोडी घडत होत्या त्या यापूर्वी महाराष्ट्राने कधी बघितल्या नव्हत्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणे हे अशक्य आता शक्य झालं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा अनोखा मेळ पहिल्यांदाच बघायला मिळत आहे. असो पण हे सर्व घडवण्याचं श्रेय शरद पवार यांना दिले जात आहे. खरा चाणाक्या कोण अश्या बऱ्याच चर्चा माध्यमांवर चालू होत्या. शरद पवारांनी नुकतेच या सगळ्या घडामोडींची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी गेल्या महिनाभरात घडलेल्या घटनांचा पहिल्यांदाच खुलासा केलाय. यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीची. या भेटीत नेमकं काय झालं? पंतप्रधान काय म्हणाले? हा पवारांचाच डाव होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शरद पवारांनी दिलीय.
पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी मला राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली असे जे काही म्हटले जाते ते खरं नाही. परंतु त्यांनी सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदं देण्याची ऑफर दिली होती. मात्र भाजपसोबत जायचचं नसल्याने मी ती ऑफर नाकारली असा खुलासाही त्यांनी केला. शरद पवार पुढे म्हणाले की, पंतप्रधानांना भेटण्याची वेळ मी आधीच मागितली होती. परंतु ते जमले नाही. शेवटी पंतप्रधान कार्यालयाने वेळ दिली. संभ्रम निर्माण व्हावा अशी पंतप्रधान कार्यालयाची इच्छा असावी. मात्र मला त्याची काळजी नव्हती. मी विदर्भातल्या दुष्काळी दौऱ्यावरून आलो होतो. मलाही त्यांना भेटायचं होतं त्यामुळे मी भेटलो. आमच्या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलणं झालं आणि शेवटी जाताना पंतप्रधान मोदींनीच हा विषय काढला. ते म्हणाले राज्यात तुम्ही आणि आम्ही एकत्र काम केलं तर चांगलं होईल. थोडक्यात भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र यावे असे पंतप्रधानांना वाटत होते. त्यांनीच तसा प्रस्ताव मांडल्यावर मी त्यांना स्वच्छ आणि स्पष्टपणे नाही असं सांगितले.
शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी सोनिया कष्या तयार झाल्या हे सांगताना पवार म्हणाले की, राष्ट्रीय प्रश्नांवर विरोधाला विरोध करणार नाही, मात्र एकत्र येणं शक्य नाही असं मी मोदींना नम्रपणे सांगितलं. भाजपसोबत जाण्याला राष्ट्रवादीचं केडरही तयार नाही. आमची विचारसरणीही वेगळी आहे. त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही हे मी मोदींना स्पष्टपणे सांगितलं.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा