दिलीप वळसे पाटील पुण्याचे पालकमंत्री?

पुणे: महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार बनणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.मात्र आता यानंतर पुणे जिल्ह्यात मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि सात वेळा निवडून आलेेल्या दिलीप वळसे-पाटील यांची पुण्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पुणे जिल्ह्याचे नेतृत्व आत्तापर्यंत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे होते। मात्र अजित पवारांची भूमिका स्पष्ट नसल्याने पुण्याचे पालकमंत्रीपद दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे जाईल, असे बोलले जात आहे.

पुणे जिल्ह्यातील राजकारणात दिलीप वळसे-पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. वळसे पाटील यांचा अनुभव पाहता त्यांची मंत्रिपदी पुन्हा नियुक्ती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वळसे पाटील हे अजित पवारांच्या देखील खूप जवळचे मानले जातात. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतल्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी वळसे पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा