आंबेगाव, (साईदिप ढोबळे): राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी
पुणे जिल्ह्यातील नागापुर येथील श्री क्षेत्र थापलींग ल्यात्रेला भेट दिली. यात्रा म्हंटले खाण्यावर ताव मारणं हे काही न सांगण्याची गोष्ट आहे. पण व्हीआयपी व्यक्ती असली की त्यांना या गोष्टींचा आनंद घेणे जमत नाही. परंतु, उत्पादनशुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील हे यात्रेला भेट देण्यासाठी आले असता यात्रेमध्ये प्रसिद्ध असलेली जिलेबी व भजी खाण्याचा मोह दिलीप वळसे पाटील यांना आवरला नाही आणि त्यांनी चक्क भर यात्रेमधील हॉटेलमध्ये जाऊन जिलेबी व भजी खात या यात्रेचा आनंद लुटला.
खरतर राजकीय नेते मंडळी म्हटले की त्यांची जेवणाची पद्धत व नाश्त्याची पद्धत निराळीच असते; परंतु दिलीप वळसे पाटील हे याला कुठेतरी अपवाद असल्यासारखेच वाटले कारण आपले व्हीआयपी कल्चर त्यांनी बाजूला ठेवत सर्वसामान्य बरोबर यात्रेच जिलेबी व भजांवर ताव मारत यानिमित्ताने यात्रेचा पुरेपूर आनंद घेतला.