आंबेगाव, ३० ऑगस्ट २०२०: जुन्नर व आंबेगाव विभागातील कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण काल पुर्ण क्षमतेने भरले असून धरणातून घोड नदीपात्रात काल संध्याकाळी चार वाजता २००० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
भिमाशंकर व डिंभे धरण क्षेत्रात सध्या चांगला पाऊस सुरू असुन हा विसर्ग अजून वाढत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून घोड नदीकाठच्या गावांना व लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण क्षेत्र परिसरात होणाऱ्या दमदार पावसाने डिंभे धरण आज तुडुंब भरले आहे. धरण ९९ टक्के भरल्याने धरणाच्या डाव्या कालव्यातून २००० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मागील महिन्यापासून आदिवासी भागात व धरण क्षेत्र परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे घोड नदी दुथडी भरुन वाहत असून डिंभे धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ होत आहे. काल संध्याकाळी धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
आंबेगाव, जुन्नर, शिरुर व नगर तालुक्यातील काही भाग शेती व पिण्याच्या पाण्यासाठी हे धरण वरदान आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. धरणात सध्या १०० टक्के इतका पाणीसाठा झाला, असून धरणातून नदीपात्रात २००० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी: साईदिप ढोबळे