अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची आई बेट्टी कपाडिया यांचे निधन

16

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्या आई बेट्टी कपाडिया (वय ८०) यांचे यांचे रविवारी (दि.१)रोजी पहाटे चारच्‍या सुमारस निधन झाले. मुंबईतील एका रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचे सांत्वन करण्यासाठी सकाळपासूनच बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या घरी हजेरी लावली आहे. यासोबतच सनी देओल, ऋषी कपूर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी बेट्टी यांना आदरांजली वाहिली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा