गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा डिंपल कपाडिया रुग्णालयात

डिंपल कपाडिया रुग्णालयात

मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
डिंपल यांच्या आजाराबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. डिंपल कपाडिया यांच्या भेटीसाठी त्यांची कन्या अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि जावई अक्षय कुमार हिंदुजा रुग्णालयात गेले होते. त्यानंतर त्यांच्या आजारपणाची माहिती समोर आली आहे. डिंपाल कपाडिया या ६२ वर्षांच्या असून त्या १९७३ पासून चित्रपटांमध्ये काम करत आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले असून त्यात सागर, जांनबाज, नरसिंहा, राम लखन, क्रांतिवीर यांसह आदी चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका बजावलेल्या आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version