गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा दीपिकाचा ‘छपाक’ इंटरनेटवर लीक

दीपिकाचा ‘छपाक’ इंटरनेटवर लीक

मुंबई : सत्य घटनेवर आधारित असलेला दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ हा चित्रपट रिलीज होऊन दोन दिवस उलटले नाही तर, हा चित्रपट ऑनलाईन लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या चित्रपटांना लीक करण्यासाठी कुख्यात असलेल्या तमिळ रॉकर्सनेच हा चित्रपट लीक केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
छपाकने पहिल्या दिवशी ४.५ कोटी रुपये कमावले असून वीकेण्डला हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, चित्रपट लीक झाला असल्यास त्याच्या कमाईला फटका बसू शकतो. असे असले तरी यावर निर्मात्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.

error: Content is protected !!
Exit mobile version