दिरानेच केला भावजयीचा शिकार

जळगाव, ५ फेब्रुवरी २०२१: महाराष्ट्रात आये दिन बलात्काराच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसत आहे. माणसांची वृत्ती हि स्त्रियांच्या बाबतीत दिवसेंदिवस अजून हीन होत चालेली दिसत आहे. ज्या मुळे अश्या घटना घडत आहेत. या घटनेमधे असे घाणरेडे कृत्य करणारे लोक फार वाईट विचारांच्या श्रेणी मधील असतात. जळगाव मधून एक अशीच धक्कादायक बलात्काराची घटना समोर आली आहे.
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या विधवा भावजयीवर दिरानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिडिता लघुशंकेसाठी उठली आसता नराधम दिराने तिला तू मला खूप आवडतेस, असे म्हणत शरीरसुखाची मागणी केली. ज्याला भावजयीने विरोध दर्शवला.
भावजयीने विरोध दर्शवल्या नंतर दिराने तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जिवंत ठेवणार नाही, आशी धमकी देखील त्याने दिली. पीडितेच्या फिर्यादी मध्येच पिडितेने असे सांगितले. तर नराधम दिराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आता तो जेल मध्ये आहे.
मात्र या घटनेमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा हदरला आहे. वारंवार घडणार्या अश्या घटनेमुळे मुलींचा आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे.  सरकारने देखील यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखील जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा