जम्मू कारागृहात महासंचालकांची हत्या

जम्मू-काश्मीर, ४ ऑक्टोंबर २०२२ : जम्मू काश्मीर कारागृहाचे महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. जम्मूतील उदयवाला भागातील एका घरात लोहिया यांचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासानुसार लोहिया यांची हत्या त्यांच्याच कर्मचाऱ्याने केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत लोहिया हे अहवालानुसार १९९२ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत, यांची दोन महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीरच्या तुरूंग विभागाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हेमंत लोहिया यांच्या घरी काही काम चालू होतं, त्यामुळं ते जम्मूमध्ये त्यांचा मित्र राजीव खजुरिया यांच्या कुटुंबासोबत राहत होते. इथंच त्यांची रात्री उशिरा ११.४५ च्या सुमारास गळा चिरून हत्या करण्यात आली.

या घटनेत त्यांचा नोकर यासिर अहमद याचं नाव समोर आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो खून केल्यानंतर पळताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिर हा गेल्या ६ महिन्यांपासून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या घरी काम करत होता.या घटनेत आता दहशतवादी कनेक्शन समोर आल आहे, पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) नावाच्या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने. हत्येनंतर एक पत्रक जारी केलं आहे. त्यात म्हटलं की, आमच्या विशेष पथकाने गुप्त अभियान राबवलं आहे. त्यामध्ये पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या केली आहे. हे एक मुख्य लक्ष होते. आम्ही केव्हाही, कुठेही अचूकपणे हल्ला करू शकतो. गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वी ही एक छोटीशी भेट आहे, असा इशाराही पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने दिला आहे.

पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट ( PAFF ) काय आहे

पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहे. काश्मीरमधील कलम ३८० हटवल्यानंतर या संघटनेचं नाव समोर आलं. याआधीही या संघटनेनं अनेकदा व्हिडिओ जारी करून धमक्या दिल्या आहेत. ऑक्टोबर २०२२ मध्ये पुंछ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही या संघटनेचं नाव समोर आलं होतं. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले आहे.

हेमंत लोहिया यांच्या हत्येनं पोलिस प्रशासनाची झोप उडाली आहे. कारण, ही हत्या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यापूर्वी झाली आहे. त्यामुळंच आत्ता सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा