भोसरी अंध मुलांची शाळा, ब्रह्मदत्त मतिमंद विद्यालय येथे पारंपरिक तालवाद्यांद्वारे अपंग सप्ताह साजरा

पिंपरी-चिंचवड, १० डिसेंबर २०२२ : ता. तीन डिसेंबर हा जागतिक अपंग दिन. त्यानिमित्ताने पुणे जिल्ह्यातील अपंग शाळांमध्ये विविध उपक्रमांद्वारे अपंग सप्ताह साजरा करण्यात आला. पिंपरी-चिंचवडमधील अंध व मतिमंद विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अपंग सप्ताह उत्साहात साजरा केला.

पारंपरिक तालवाद्यांचा ठेवा जपणारे युवक कु. ओंकार जोशी, रितेश बुरुड व संकेत लोहकरे यांनी भोसरी येथील अंध मुलांची शाळा व प्राधिकरणातील ब्रह्मदत्त मतिमंद मुला–मुलींची शाळा येथील विद्यार्थ्यांसाठी ढोलक, संबळ, टाळ, डफ, चंडा, कोहन, हार्मोनियम या वाद्यांचे तालबद्ध व लयबद्ध वादन केले. या अनोख्या वाद्यांच्या वादनास दिव्यांग विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून, नाचून, गाऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंधशाळा प्रमुख श्री. पांडुरंग साळुंखे, ब्रह्मदत्त विद्यालयाचे प्रमुख श्री. रवी जोशी व दोन्ही शाळांतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा