पुणे २४ ऑगस्ट २०२४ : पुण्यातील खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा ८७३४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढवून आज दुपारी १९ हजार ११८ क्यूसेक करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन उपविभागीय अभियंता, मुठा कालवा पाठबंधारे उपविभाग पुणे यांनी केलीय.
न्युज अनकट प्रतिनीधी : जयश्री बोकील