पुरंदर दि. १२ ऑगस्ट २०२०: गेल्या दहा ते बारा दिवसांत नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे नीरा खोऱ्यातील सर्व धरणे भरली असून आज वीर धरणातून ४५०० क्यूसेक वेगाने पाणी नीरा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. वीर धरणाच्या सांडव्यातील पाच नंबरची मोरी चार फुटाने उचलून निरा नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
आज दुपारी चार वाजता वीर धरणाच्या सांडव्याची पाच नंबरची मोरी एक फुटाने उचलून निरा नदी पात्रात सांडव्यातून १२५० वेगाने तर विद्युत गृहातून ८०० क्यूसेक वेगाने पाणी निरा नदी पात्रात सोडण्यात येत होते. मात्र रात्री धरणांमध्ये येणाऱ्या पाण्यात मध्ये वाढ झाल्याने रात्री साडेआठ वाजल्यापासून धरणाच्या पाच नंबरच्या मोरीचा दरवाजा चार फुटाने उचलून ४५०० क्युसेक्स वेगाने पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
पुढील काळात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जर जास्त पाऊस झाला तर जास्त प्रमाणात पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी असा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतची माहिती धरण विभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी दिली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे.