पुरंदर, पुणे ४ ऑगस्ट २०२४ : वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरू असलेला ५३ हजार ८४७ क्युसेक एवढा विसर्ग वाढवून तो आज दुपारी २ वाजता ६१ हजार ९२३ क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केलय.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा ३५००२ क्युसेक्स विसर्ग वाढवून सायंकाळी ५ वा. ४५७०५ क्यूसेक्स करण्यात येत आहे. त्यातही आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो.
पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशी माहिती, कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण तसेच खडकवासला पूर नियंत्रण कक्षा कडून प्रसिद्ध करण्यात आलीय.
न्युज अनकट प्रतिनीधी : जयश्री बोकील