मेजर जनरल पातळीवर पुन्हा चर्चा, भारताचा माघार घेण्यास नकार

लडाख, दि. ११ जून २०२०: लडाख मध्ये सुरू असलेल्या सीमा वादावरून काल पुन्हा एकदा भारतीय सैन्यांचे कमांडर व चिनी सैन्याचे कमांडर यांच्यामध्ये बैठक झाली. हे संभाषण सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे. परंतु भारत सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एलएसी वर चिनी सैनिकांचे कारवाई जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत कोणताही तोडगा या चर्चेतून निघणार नाही.

सीमेवर दहा हजार चिनी सैन्यासह लढाऊ विमाने, टँक तसेच इतर युद्धसामग्री हे भारताच्या चिंतेचे कारण बनले आहे. तसे, मंगळवारी चीनने भारतातील गोगरा पोस्ट जवळील हॉट स्प्रिंग क्षेत्रापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर सुमारे २० टक्के सैन्य मागे घेतले आहे. पण सध्याच्या भारत-चीन तणावाच्या चौथ्या बिंदू पांगोंग लेकच्या उत्तरेकडील बिंदूतून चीन ने अजिबात माघार घेतलेली नाही. त्याच ठिकाणी ५ मे रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, पांगोंग सरोवराच्या फिंगर ४ भागात चिनी सैन्य मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि चिनी सैनिकांसमोर तेवढ्याच संख्येने भारतीय सैन्याने देखील आपली उपस्थिती ठेवले आहे. एलएसी वरून जोपर्यंत चीनी सैन्य माघार घेत नाही तोपर्यंत भारतीय सैन्यदेखील सीमेवरून माघार घेणार नाही.

याआधी ६ जून रोजी झाली होती चर्चा

६ जून रोजी लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी मोल्दो येथे चीनच्या मेजर जनरल लियू लिन यांच्याशी चर्चा केली होती. मागील चर्चा करण्यात आलेला हा भाग चीनच्या भागात आहे. यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्यांचे प्रमुख आणि संरक्षण प्रमुख यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली, या चर्चेत देखील सध्या उपस्थित असलेल्या वादावर बोलणी करण्यात आली. परंतु त्यातून दोन्ही देशांकडून एक साधारण वक्तव्य समोर आले होते त्याखेरीज कोणताही तोडगा काढण्यात आला नव्हता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा