महिला आणि युवा नेत्यांना कॅबिनेटमध्ये संधी देण्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्या बैठकीत चर्चा

मुंबई, ५ मे २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेले होते. दोन्ही नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली. विस्तारात महिलांना संधी देण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. महिलांचा सन्मान ही राज्याची पहिला प्राथमिकता असली पाहिजे, असे बैठकीत ठरल्यांचे सांगितले जात आहे. तसेच या बैठकीत युवा नेत्यांना कॅबिनेटमध्ये संधी देण्यावर चर्चा झाल्याचेही सांगितल्याचे समजते. घरात किंवा बंगल्यावर बसून नाही तर ग्राउंड लेव्हलवर जाऊन काम करणारे नेते मंत्रिमंडळात घ्यायला हवेत,अशी भावना मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांच्याकडे व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.

त्याचबरोबर शिवीगाळ करणाऱ्या आणि आक्षेपाहार्य वर्तन करणाऱ्या नेत्यांनाही मंत्रिमंडळातून दूर ठेवण्यात येणार आहे. महायुतीवर ५० खोके, एकदम ओकेचा डाग लागला आहे. त्याला कामाच्या माध्यमातून उत्तर देण्यावरही चर्चा झाली आहे. राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक जास्त परिश्रम करण्याचा सल्ला अमित शाह यांनी या दोन्ही नेत्यांना दिल्याचे सांगितले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा