गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेबाबत पंतप्रधानांच्या उपस्थितीत चर्चा

सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेबाबत पंतप्रधानांच्या उपस्थितीत चर्चा

नवी दिल्ली, २१ एप्रिल २०२३: लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यातील संघर्षामुळे हाहाकार उडालेल्या आफ्रिका खंडातील सुदान देशांमध्ये हजारो भारतीय लोक अडकले असून त्यांची सुटका करण्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीस परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर तसेच हवाई दल, नौदल, परराष्ट्र खाते आणि संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एस. जयशंकर हे सध्या गयाना देशाच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आभासी मार्गाने बैठकीत सहभाग घेतला होता. सुदानमधील गृहयुद्धात आतापर्यंत २७० लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका भारतीयाचा समावेश आहे. सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी मोहीम हाती घेतली जाऊ शकते का, या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सुदानमधल्या खार्टूम शहरात स्थिती जास्त चिंताजनक असून येथून बहुतांश लोकांनी पलायन केलेले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version