पुणे, २१ ऑक्टोबर २०२२: पाण्याचे कारंजे आणि चॉकलेट कारंजे आपण सर्वांनी पाहिले आहेत. आता तर शॅम्पेन कारंजे देखील पाहायला मिळतात. पण तुम्ही कधी पाणी पुरीच्या पाण्याचे (गोल गप्पे) कारंजे पाहिले आहेत का?
पाणीपुरी / गोलगप्पा लोकांना खूप आवडते. पाणीपुरी
खाण्यासाठी लोक रांगेत उभे असतात. दरम्यान, असा एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून लोकांना विचार करायला भाग पाडले जात आहे. त्याला काही लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर काहींनी नापसंती व्यक्त केली आहे. चला तर पाहू नक्की काय फोटोत आहे ते….
या फोटोमध्ये पाणी पुरीचे पाणी एखाद्या कारंजा प्रमाणे त्या तीन भांड्यांमधून खाली येत आहे आणि लोक कारंज्यातील गोड पाणी पुरीमध्ये घेऊन खाण्याचा आनंद घेत आहेत. हा फोटो @Naa_Cheese नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. ‘माझ्या आयुष्यात देखील या गोलगप्पे कारंजाची गरज आहे असे कॅप्शन लिहिले आहे.
ट्विटरवर शेअर झालेला हा फोटो अनेक लोकांनी विविध सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर पुन्हा शेअर केला आहे. या फोटोला ४.२k पेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. तर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काही लोकांना ही कल्पना खरोखर अनोखी वाटली आणि त्यांना हे करून देखील पहावेसे वाटले! तर हे भारतातील सर्वाधिक विकले जाणारे उत्पादन होईल, असा अंदाज एका ट्विटर वापरकर्त्याने व्यक्त केला आहे. तर काहींना ही कल्पना अजिबात आवडली नसून अस्वच्छ प्रकार वाटत आहे.
अन्य प्रतिक्रिया :
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक