गलवान नदीतून चीनने आपल्या बोटी घेतल्या मागे, आज पुन्हा होणार चर्चा

5

लडाख, दि. १० जून २०२०: मे महिन्यापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये लडाख भागांमध्ये सुरू असलेला वाद आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. अनेक चर्चा व कूटनीतीक संवादातून हा वाद कमी होण्याच्या दिशेने जाताना दिसत आहे. या सौम्यपणामुळे बुधवारी दोन्ही सैन्यांत आणखी एक कमांडर-स्तरीय संभाषण होऊ शकते, जेणेकरून हा विवाद संपू शकेल.

पुढील काही दिवस भारत आणि चिनी सैन्यामध्ये अनेक चर्चेच्या फेऱ्या होणार आहेत. परंतु यापूर्वी मंगळवारी अशी बातमी आली होती की चीनी सैन्य गॅल्व्हन परिसर, पेट्रोलिंग पॉईंट १५ आणि हॉट स्प्रिंग क्षेत्रापासून सुमारे अडीच किमी अंतरावर मागे सरकले आहे. तसेच जेंव्हा चिनी सैन्याने माघार घेतली तेंव्हा भारतीय सैन्यानेही काही प्रमाणात आपली पावले मागे घेतली.

मे महिन्यापासून सुरू असलेल्या या सीमा विवादामध्ये झालेली ही सकारात्मक घटना एक चांगले संकेत मानले जात आहे. बुधवारी म्हणजेच आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. आज चर्चेतून आणखीन सकारात्मक गोष्टी समोर येतील अशी अपेक्षा सर्वांना आहे. पुढील येणाऱ्या काळात देखील अशाच चर्चा होत राहणार आहेत त्यामुळे हा वाद मिटण्याच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

मंगळवारी चीनने गॅल्वान व्हॅलीजवळ तैनात केलेल्या बोटीही मागे घेतल्या आहेत. यानंतर भारताने आपले काही सैनिक आणि वाहने माघारी घेण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय लष्कराच्या वतीने सद्य विवादाबद्दल माहिती देण्यात आली आणि त्याबरोबरच तोडगा निघण्यास सुरुवात झाली.

आता पुढील कमांडर स्तरावरील चर्चा होणार आहे जेणेकरून सीमेवरील तणाव कमी होऊ शकेल. या सर्व चळवळींच्या दरम्यानही भारतीय सैन्य सावध आहे आणि ते क्षणोक्षणी परिस्थितीवर नजर ठेवून आहे. प्रत्येक परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात सामोरे जाण्याची तयारी भारताच्या वतीने करण्यात आली आहे. भारतातून असे संकेत देण्यात आले आहेत की जर डोकलाम सारख्या दीर्घकालीन वाद निर्माण झाला तर भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा