एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा किळसवाणा प्रकार

नवी दिल्ली, ५ जानेवारी २०२३ : २६ नोव्हेंबरला न्यूयॉर्क-दिल्ली विमानात एका मद्यधूंद प्रवाशाने महिलेच्या अंगावर लघवी केल्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एअर इंडियाच्या प्रवासात किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये एका व्यक्तीने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कृत्य करणाऱ्या प्रवाशाने महिलेची लेखी माफी मागितल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, एअर इंडियाच्या फ्लाइट १४२ मध्ये ६ डिसेंबर रोजी ही घटना घडली. विमानाच्या पायलटने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलला याची माहिती दिली, त्यानंतर किळसवाणं कृत्य करणाऱ्या पुरुष प्रवाशाला पकडण्यात आले.

  • ‘त्या’ प्रवाश्यावर होणार कारवाई

दरम्यान, पहिल्या प्रकरणात एअर इंडियाच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी संबंधित प्रवाशाविरोधात एफआयआर नोंदवला असून, हा आरोपी मुंबईचा रहिवासी आहे; पण सध्या तो इतर राज्यात आहे. पोलिसांचे पथक या प्रवाशाच्या शोध घेत असून, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. तर दुसरीकडे एअर इंडियानेही या प्रकरणी कारवाई करत आरोपीवर ३० दिवसांसाठी बंदी घातली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा