Sanjay Raut on Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने पाच वर्षानंतर पुन्हा एकदा डोकवर केलं आहे. त्यामुळे हे प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चेत आल आहे. आज दिशा सालियनच्या वडिलांनी म्हणजेच सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत एक याचिका दाखल केली. त्यामध्ये त्यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.“हे प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. जे प्रकरणच नव्हतं. त्या वडीलांचे जे म्हणणं आहे की त्यांच्यावर दबाव होता. खरंतर त्यांच्यावर आता दबाव आहे. असे संजय राऊत म्हणाले आहेत.
काय म्हणाले संजय राऊत :
हे संपूर्ण प्रकरण ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. राऊत म्हणाले की, “ज्यांच्या मुलीच निधन झाल ते आई वडील पाच वर्ष गप्प बसू शकत नाही. महाराष्ट्रात अशी अनेक प्रकरण घडली आहेत. कुटुंबिय किंवा आई-वडील हे न्यायासाठी समोर येतात, पोलीस तपासाला सहकार्य करतात. पाच वर्षांनंतर त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्यावर दबाव होता, यावर तुम्ही कसा विश्वास ठेवणार आहात? हा नक्कीच ठाकरे कुटुंबाला आणि आमच्या शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तो स्पष्ट दिसतो आहे.”
दिशा सालियन प्रकरण नेमक काय ?
दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी इमारतीच्या छतावरुन पडून मृत्यू झाला होता. दिशा सुपरस्टार बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतची मॅनेजर म्हणून काम करत होती. सुशांत सिंह राजपुतची आत्महत्या होण्याच्या आधी तिचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पोलिसांनी पोस्टमार्टम करून आत्महत्येची नोंद केली होती. त्यावेळी नितेश राणे आणि नारायण राणे यांनी तीची हत्या करण्यात आली आहे असा आरोप केला होता. याशिवाय यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा सुद्धा हात आहे असा आरोप त्यांनी केला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर