गोल पोस्ट आरोग्य कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा निर्जंतुकीकरण

कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा निर्जंतुकीकरण

कल्याण, दि. ११ जुलै २०२०: कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोना रुग्णांचा आकडा हा १० हजाराच्या घरात पोहचला आहे. त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून केडीएमसीतर्फे शहरातील रस्त्यांवर औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीत आज कोरोनाचे तब्बल ६०६ रुग्ण सापडले असून ८ जणांचा मृत्यू झालाय.

वाढती रुग्ण संख्या नियंत्रित करण्यासाठी आता शहरात पुन्हा एकदा औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे. शहरातील प्रमूख चौक आणि रस्त्यांवर ही औषध फवारणी केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन विभागातर्फे देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजेश्री वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version