खाजगी व शासकीय रुग्णालयाचा वेस्ट कचरा मोकल्याजागेत टाकल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका

बारामती, २१ ऑक्टोबर २०२० : बारामती तालुक्यातील साबळेवाडी हद्दीतील गोलांडेवाडी येथे माळरानावर हानिकारक असणारा हॉस्पिटलचा दवाखान्याचा वेस्ट कचरा मोकळ्या जागेत टाकण्यात येत आहे. माळरानावर व चारित अनेक ठिकाणी इंजेक्शनच्या वापरलेल्या सुया, वापरलेल्या औषधांसह  वेस्ट कचरा टाकून देण्यात आला आहे.

गोलांडेवाडीच्या हद्दीत अनेक ठिकाणी पिशव्यांमध्ये हा कचरा मेडिकलचे साहित्य आढळून आले आहे.
मुसळधार पावासाच्या पाण्याने कचऱ्यामधील साहित्य सगळ्या परिसरात वाहून सगळीकडे पसरत आहे. वापरलेल्या इंजेक्शन सुया, रक्त नमुनाच्या छोट्या ट्युब , सलाइन ,आयव्हीसेट, वापर झालेले औषध, जे माणसांना हानिकारक बायोमेडिकल वेस्ट कचरा आढळून आल्यामुळे गोंधळ झाला आहे.मागील काही महीन्यांपासून हा कचरा मोकळ्या जागेत टाकला जातो आहे.याबाबत परिसरातील आकाश गोलांडे, विशाल गाडेकर या तरुणांनी कचरा टाकणाऱ्या हॉस्पिटलवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.संबंधितांना समज देण्याचे आश्वासन पोलीसांनी दिले आहे.

याठिकाणी मेंढपाळ,व गाई चरण्यासाठी शेतकरी येत असतात जनावरांच्या पोटात हा कचरा जाण्याची शक्यता आहे .त्यामुळे जनावरे दगावू शकतात असे आरोग्य विभागाकडुन सांगण्यात आले . टाकून देण्यात आलेला सर्व वेस्ट कचरा  बारामतीमधील खासगी व शासकीय  रूग्णालयातील असल्याचे या दवाखान्यातील  बायोमेडिकल वेस्ट कचरा एका बायोमेडिकल वेस्ट कंपनीला देण्यात येत असतो, त्याला जिल्हा परिषद व खासगी रूग्णालया कडून ठेका दिलेला आहे.

यामुळे बारामती अनेक ठिकाणी असे बायोमेडिकलचा वेस्ट कचरा मोकळ्या जागेत टाकून देण्यात येत असतो, मात्र, याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व वेस्ट कचरा टाकून देणाऱ्या संबंधित लोकांचे लागेबंध असल्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकाऱ्यांकडून केला जातो आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव