दसरा मेळाव्या वरून शिवसेना आणि शिंदे गटात वाद पुन्हा उफाळला, मेळाव्याचा वाद कोर्टात जाण्याची शक्यता

मुंबई, ४ सप्टेंबर २०२२: एकनाथ शिंदे यांच्या सह ५० आमदारांच्या बंडानंतर वेगवेगळे निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. त्यामध्ये खरी शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हे चिन्ह कोणाकडे राहणार यासारखे विषय आहेत. शिवसेनेने दसरा मेळाव्याची तयारी सुरू केलेली असतानाच, शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्याच्या तयारीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दोन्ही बाजूंनी दसरा मेळावा हा विषय प्रतिष्ठेचा करण्यात आला असून, महानगरपालिका कोणाला परवानगी देते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. महापालिकेने परवानगी नाकारल्यास शिवसेना कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत आहे.

शिवसेनेतील मंडळी नंतर खरी शिवसेना कुणाची, हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. अशातच दुसरीकडे आता दसरा मेळाव्यावरून मोठे घामासन पाहायला मिळत आहे. दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. परंतु मागील दोन वर्षे कोरोनामुळे या दसरा मेळाव्याला खंड पडला आहे. यावर्षी मात्र सर्वच गोष्टी पूर्ण क्षमतेनं सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे यंदा शिवसेच्या दसरा मेळाव्याला अधिक महत्वं आहे. सत्ता बदल होऊन राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे गटाने पुन्हा आव्हान दिले आहे. शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे परवानगी मिळाली नाही तर आता दसरा मेळाव्याचा वादही कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेकडून याबाबत अनिल परब म्हणाले, महापालिकेनं जर परवानगी दिली नाही तर दसरा मेळावा घेण्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय सेनेकडे आहे. यापूर्वी शिवाजी पार्कला सायलन्स झोन जाहीर केल्यावरही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर प्रश्नचिन्ह तयार झाले होते. परंतु दसरा मेळावा पारंपरीक उत्सव असल्याचं म्हणत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आली होती. आता उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यावेळी नेमकं काय होते हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा