बागपत, ५ डिसेंबर २०२०: दोन मित्रांमधील पैशांच्या व्यवहाराचा वाद इतका वाढला की, बदमाशांनी जंगलात एका तरूणाला पळवून नेले आणि लग्नाच्या अवघ्या ३ दिवस आधी त्याचे गुप्तांग कापले. ही गंभीर घटना उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील आहे.
असा आरोप लावण्यात आला आहे की, पीडित युवकाच्या मित्राने त्याच्या दोन साथीदारांसह प्रथम पीडित युवकाला बंधक बनवलं. त्यानंतर त्याला इतरत्र नेण्यात आलं व त्याचं गुप्तांग कापलं. त्यानंतर आरोपी व त्याचे साथीदार त्या युवकाला जखमी अवस्थेत तिथेच सोडून गेले. सध्या या युवकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी उच्च केंद्रात पाठविण्यात आले आहे.
वास्तविक, प्रकरण कोतवाली शहर अंतर्गत ईदगाह परिसरातील असून समीर नावाच्या युवकाचा त्याचा मित्र परवेझ याच्याशी सुमारे एक लाख रुपयांवरुन वाद झाला होता.
पीडित युवकाचा मित्र परवेजच्या नावावरून दोन तरुण पीडित युवकाकडं आले आणि पैशासाठी त्यांनी त्याच्यावर दबाव आणला, असा आरोप समीरनं केलाय. त्यानंतर, दोन तरुणांनी त्याला जबरदस्तीनं आपल्यासोबत जंगलात नेऊन त्याचं गुप्तांग कापलं आणि जखमी अवस्थेत जंगलात सोडलं.
ही माहिती समीरनं त्याच्या कुटूंबाला कळताच या तरूणाला गंभीर प्रकृतीमध्ये जिल्हा रुग्णालयात दाखल केलं, तेथे त्यांची प्रकृती पाहिल्यानंतर उच्च केंद्र मेरठ येथे रेफर करण्यात आलं. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या तरूणाची प्रकृती चिंताजनक आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे