जमिनीच्या बांधाच्या कारणावरून भावकीचा वाद, वयस्कर शेतकऱ्यांला मारहाण..!

5
शेठफळ दि. ०३ जानेवारी २०२१ : शेतजमिनीच्या बांधाच्या कारणावरून झालेल्या भांडणात दोन जणांनी मिळून एका वयस्कर शेतकऱ्याला मारहाण केली. ही घटना इंदापूर तालुक्यातील शेठफळ हवेली, येथे मंगळवार दि. २९ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ६ च्या दरम्यान घडली आहे. स्वतःच्या शेतात शेतकरी नारायण चव्हाण हे शेतात बैल चारत असताना त्यांच्या दोन पुतण्यान्यानी जबर मारहाण केली आहे.
जखमी नारायण चव्हाण यांच्या पत्नी गोदाबाई नारायण चव्हाण ( वय- ६५ ) रा. शेठफळ हवेली, ता. इंदापूर जि. पुणे यांनी या प्रकरणी बावडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सोमनाथ सूर्यभान चव्हाण, व देविदास सूर्यभान चव्हाण, रा. शेठफळ हवेली यांच्या विरोधात कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४, प्रमाणे बावडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे आज बावडा पोलिसांनी बोलताना सांगितले आहे. व आरोपींना लवकरात लवकर अटकही करू असे सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गोदाबाई चव्हाण यांचे पती नारायण चव्हाण आणी आरोपीचे शेताच्या बांधावरून मागील काही दिवसापासून भांडणे सुरू आहेत. वयस्कर जखमी नारायण चव्हाण, यांना भांडणाच्या रागातुन आरोपींने  मंगळवारी सायंकाळी ६ च्या दरम्यान नारायण यांना हाताने, व लाकडाच्या साह्याने जबर मारहाण करत शिवीगाळ केली. जखमी शेतकरी नारायण चव्हाण यांच्या पत्नी गोदाबाई चव्हाण यांनी बवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
व जखमी नारायण चव्हाण यांना इंदापूर येथिल शासकीय दवाखान्यात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्यांची गंभीर अवस्था पाहून पुढील उपचारासाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे दाखल करण्यात सांगितले आहे. आरोपींना बावडा पोलिसांनी तात्काळ अटक करावी असे जखमी नारायण चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी ‘न्यूज अनकटशी’ बोलताना मत व्यक्त केलं आहे. पुढील तपास बावडा पोलीस स्टेशन करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा