चीनमधील मुसलमानांवरून तुर्की आणि चीनमध्ये विवाद

तुर्की, ८ एप्रिल २०२१: उइगर मुस्लिमांच्या मुद्दय़ावर चीन आणि तुर्कीमध्ये तनाव वाढताना दिसत आहे. तुर्कीने चिनी राजदूताला बोलावले आहे. चिनी दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर च्या माध्यमातून सांगितले की उइगर मुस्लिमांवरील अत्याचाराबद्दल चीनवर टीका करणारे दोन तुर्की नेत्यांविरोधात कारवाई करावी.

तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी चिनी दूतावासाच्या राजदूताला बोलविण्यात आले. परंतु, अधिकार्‍यांनी सविस्तर माहिती दिली नाही. मंत्रालयाच्या नियमानुसार नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

मंगळवार पूर्वी चीनच्या दूतावासाने तुर्की मधील प्रमुख विपक्ष ‘गुड पार्टी’ चे प्रमुख मेरल अक्सनर आणि तुर्की ची राजधानी अंकारा चे महापौर मंसूर यूवास यांना ट्विटरवर टॅग करत चीन च्या बचावात प्रत्युत्तर दिले. चिनी दूतावासाने म्हटले की, ‘चीन देशा अंतर्गत काय करतो हा चीनचा अधिकार आहे.’ यानंतर चिनी दूतावासाने केलेले हे वक्तव्य तुर्की मध्ये या दोन्ही नेत्यांना दिलेल्या धमकी च्या स्वरूपात पाहिले गेले. तुर्कीमध्ये यावरून दिवसभर चर्चा होत राहिली.

वस्तुतः या दोन तुर्की नेत्यांनी १९९० मध्ये विद्रोहाच्या वेळी चीनमधील उइगर मुस्लिमांच्या हत्येसंदर्भात एक पोस्ट पोस्ट केली होती, त्यानंतर चिनी दूतावासाने ही जुनी पोस्ट दाखवत त्यांना टॅग केले आणि प्रत्युत्तरात ट्विट केले.

चीनच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला आव्हान देणार्‍या कोणालाही चीन प्रकर्षाने प्रत्युत्तर देईल, तसेच अशा व्यक्तींचा चीन निषेध करेल, असे चिनी दूतावासाने म्हटले.

यापूर्वी, मागील वर्षी तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, चीनच्या शिनजियांग प्रांतातील मानवाधिकारांच्या उल्लंघनाबद्दल तुर्कीला चिंता आहे. तुर्कीला आशा आहे की चीनच्या नागरिकांच्या दृष्टीकोनातून उयगर मुस्लिमांनाही पाहिले जाईल. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७५ व्या बैठकीतही तुर्कीच्या समितीने वीगर मुस्लिमांबद्दल चिंता व्यक्त केली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा