कुर्डुवाडीत निदाग प्रतिष्ठानच्या वतीने २६ पुरस्कारांचे वितरण

6
माढा, २८ आँगस्ट २०२०: गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. कोरोना संसर्ग आजतागायत थांबलेला नाही. या कालावधीमध्ये पोलीस अधिकारी, डॉक्टर, पत्रकार, समाजसेवकांनी उत्कृष्ट कार्य केलेले आहे. त्यांनी यापुढेही न थांबता कार्य करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी केले
कै.काशीनाथराव भिसे सभागृहात शुक्रवार दि.२८ ऑगस्ट रोजी कोरोना योद्धा पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी श्रीगणेशाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी ज्योती कदम शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, नगराध्यक्ष समीर मुलाणी, कायदेशीर सल्लागार पी.पी.पाठक, रिखवलाल सोनिमिंडे, डॉ.रोहिणी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या कालावधीमध्ये जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी, डॉक्टर, पोलीस, पत्रकार, सामाजिक संस्था, समाजसेवकांना निदाग नाट्य कला प्रतिष्ठानच्या वतीने गुळवेलचे वृक्ष व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या वितरणामध्ये पोलीस उपनिरीक्षक चिमणाजी केंद्रे, डॉ.मोहसिन मकणु, डॉ.लकी दोशी, डॉ.सचिन माढेकर, डॉ.संतोष आडगळे, डॉ.संतोष कुलकर्णी, डॉ.सचिन गोडसे, पो.कॉ.गणेश ताकभाते, सागर सुरवसे, नितीन गोरे, तलाठी श्रावण भोये, जमीर मुलाणी, हामीद शिकलकर, अजीम तांबोळी , बालाजी लुक्कड, हरिष भराटे, निलेश उबाळे, समाधान वाघमोडे, संदीप पाटील, संतोष चव्हाण, तुकाराम पायगन, सुरेश वाघमोडे, सहयोग मित्र परिवार मोडनिंब महेश लोंढे, वसीम मुलाणी, क्षितिज टोणपे अशी पुरस्कार प्राप्त योद्ध्यांची नावे आहेत.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमरदीप पंचिरे , संकेत पाठक, रोहित वागज, राजेश साळवे, हनुमंत डोंबाळे, शाम पाटील, प्रशांत सावंत, अतुल राऊत, मंजुषा काटकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अंकुश आतकर तर आभार चंद्रकांत शिंदे यांनी मानले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा