उरुळीकांचन, दि. १५ ऑक्टोबर २०२०: उरुळी कांचन येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डाॅक्टरांना पी पी ई कीटचे वाटप करुन माणुसकी दाखवली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली तालुका कार्यकारिणीच्या वतीने एकमेका साह्य करून दाखवू व ख-या कोरोना योद्धा पर्यंत पोहचुन साहाय्य करु सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र उरूळी कांचन येथील डॉक्टर, नर्स, कर्मचारी वर्गाला ५० पी पी ई किटचे वाटप करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद सदस्या किर्तीताई कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डाॅक्टर सुचेता कदम, आरोग्य सहाय्यक नानासाहेब जाधव यांच्या उपस्थिती होती.
प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कसबे, प्रशासक एन के धापटे, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, दानशूर व्यक्तीमत्व जयप्रकाश शेळके, अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्य संत वाडःमय प्रचार प्रसार प्रमुख आनंद महाराज तांबे, हवेली तालुका अध्यक्ष संतोष महाराज काळोखे, उपाध्यक्ष तुषार महाराज चौधरी, तीर्थक्षेत्र समिती प्रमुख सुरेश महाराज कांचन, युवासमिती प्रमुख चेतन महाराज शिंदे मल्हारी महाराज गावडे, विलास महाराज उंद्रे, सदाशिव आबा कामठे, दिनकर काका पिंगळे, अलकाताई सोनवणे, सुनिता ताई कुंजीर, प्रतिभाताई कांचन, शाम महाराज मरगज, दिंडी प्रमुख पोपट महाराज, विनोद आव्हाळे, काका कांचन, महादेव नाना कांचन, राजेंद्र भोसले, आनंद कांचन तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व डॉक्टर, कर्मचारी वर्ग व गावातील वारकरी मंडळी यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम पार पडला.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे