बारामती, २७ डिसेंबर २०२०: बारामती मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांच्या माध्यमातुन देण्यात येणार्या शैक्षणिक कर्ज योजनेचा मेळावा बारामती उपनगराध्यक्ष तरन्नुम सय्यद व मुस्लीम बँकेचे संचालक अल्ताफ सय्यद यांच्या वतीने घेण्यात आला होता.
मौलाना आझाद महामंडळाच्या योजनेत बारामती शहर व तालुक्यातील २५ विद्यार्थ्यांचे कर्जप्रस्ताव महामंडळा कडून मंजूर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रस्ताव मंजुरी पत्राचे आज (दि.२७)रोजी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अल्ताफ सय्यद यांनी महामंडळाच्या कार्यालयात पाठपुरावा करून कर्जप्रस्ताव मंजूर करून आणले. अजित पवार यांनी सय्यद व महामंडळाच्या कार्यकारी संचालक यांना आदेश देऊन लवकर कर्ज मंजूरी करण्याच्या सूचना केल्या. यामध्ये अल्पसंख्यांक समाजातील मुस्लीम, जैन, ख्रिश्र्चन, नवबौद्ध, शीख व पारसी समाजातील उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अल्ताफ सय्यद यांच्याकडे संपर्क साधावा.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव











































