सोरतापवाडी, दि.२१ ऑगस्ट २०२०: सुदर्शन युवा मित्र मंडळाच्या वतीने आज इको फ्रेंडली गणपतीचे घरो- घरी जाऊन वाटप करण्यात आले यावर्षी मंडळाचे देणगीदार व काही ग्रामस्थांना ३०० इको फ्रेंडली गणपतीचे वाटप आजपासून करण्याचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या वतीने होत आहे.
पर्यावरण संवर्धक नैसर्गिक मातीपासून बनवलेली श्री गणेशा मुर्ती सोबत पाट, कुंडी, झेंडू, व तुळशीच्या बियांचे पॅकेट, मुर्ती सोबत घरपोच देत आहेत. मंडळाच्या वतीने प्रत्येक सण हा पर्यावरणपुरक करण्याचा प्रयत्न दरवर्षी असतो या वर्षीपासून गावातील ३०० घरामध्ये पर्यावरणपुरक गणेशाची स्थापना होईल, तसेच गणेश मूर्ती घरच्याघरी आनंद चतुर्थीच्या दिवशी बादलीमध्ये किंवा तत्सम आकाराच्या भांड्यात श्री गणेश मूर्ती बुडेल एवढे पाणी घेऊन तिचे विसर्जन करावे.
विसर्जन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भांड्यातील पात्रातील ओली माती श्रींच्या मूर्ती सोबत दिलेल्या कुंडी मधील सेंद्रिय खतांमध्ये एकत्रित मिश्रण करावी व आपणास दिलेल्या विविध प्रकारच्या फुलांच्या बिया त्या कुंडीत लावाव्यात, सदर मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर श्रीची मूर्ती वृक्ष गणेश स्वरूपात चिरंतन काळ आपल्या वास्तू मध्ये आनंदी व प्रसन्न वातावरणामध्ये वास्तव्य करून राहील, स्वच्छ जल,वायू, मृदा, वसुंधरेची खरी संपदा असे बोलताना सोरतापवाडी गावचे सरपंच सुदर्शन चौधरी यांनी सांगितले आहे.
यावेळी सुदर्शन युवा मित्र मंडळ, सोरतापवाडी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, गणेशमुर्तीचे नियोजन रोहन कुमार, यांनी केले तसेच कुंडीसाठी संदीप चौधरी, यांनी मदत केली असे बोलताना चौधरी यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे