पुरंदर, दि.१४ ऑक्टोबर २०२०: पुरंदर तालुक्यातील पिंगोरी या दुर्गम भागात पुरंदर मनसेच्यावतीने प्राथमिक शाळेला मुलांना वह्या पेन व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या भागात इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, म्हणुन मनसेने हा उपक्रम राबवला असल्याचे मनसेचे तालुका अध्यक्ष उमेश जगताप यांनी सांगितले.
पिंगोरी या पुरंदर तालुक्यातील दुर्गम भागातील मुलांना आता त्यांच्याच वस्तीवर किंवा घरी जावुन स्वयंसेवक शिक्षण देत आहेत. परंतु कोरोना मुळे आर्थिक कंबरडे मोडल्याने अनेक पालक शालेय साहित्य खरेदी करण्यास असमर्थ आहेत. अशावेळी मनसेचे पुरंदर तालुका अध्यक्ष उमेश जगताप यांनी पिंगोरी येथील या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. वह्या.पेन,पेन्सिल,कंपास आदी साहित्य यावेळी मुलांना देण्यात आले. यावेळी बोलताना जगताप म्हणाले, कोरोनामुळे शिक्षणही थांबले आहे. दर वर्षी राज ठाकरे यांच्या वाढदिवसाला आम्ही मुलंना शैक्षणिक साहित्य देत असतो. मात्र यावर्षी शाळा सुरू नसल्याने हे साहित्य देता आले नाही. परंतु पिंगोरी येथील स्वयंसेवक शिक्षकांच्या मार्गदर्शनाला खाली आपल्या वस्तीवरील मुलांना शिक्षण देत असल्याचे समजले.
या मुलांचा शिक्षण घेण्याचा आनंद आणखी वाढवा व त्यांना प्रोत्साहन देता यावे म्हणुन आम्ही या मुलांना हे शैक्षणिक साहित्य दिले आहे. यावेळ प्राथमिक शिक्षक सचिन सातभाई, सुनील जगताप यांचे बरोबरच पोलीस पाटील राहुल शिंदे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश शिंदे, सदस्य सुवर्णा भोसले. ग्रमपंचायतीचे सदस्य ठकसेन भोसले, ग्रामस्थ सागर भोसले, रोशनी भोसले, सुनील शिंदे, दिनेश भोसले आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे