गोल पोस्ट समाजकारण संत तुकाराम महाराजांच्या जन्मदिनानिमित्त प्रबोधनात्मक पुस्तकांचे वाटप

संत तुकाराम महाराजांच्या जन्मदिनानिमित्त प्रबोधनात्मक पुस्तकांचे वाटप

माढा, २ फेब्रुवरी २०२१: तारखेनुसार २ फेब्रुवारी रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मराठा सेवा संघाच्या वतीने पालवण ता. माढा येथील संत तुकाराम महाराज मंदिरात साजरा करण्यात आला.

यावेळी पालवण जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सार्वकालिक संत तुकाराम महाराज, महानायिका, प्रबोधनातुन मुल्यशिक्षण, राष्ट्रमाता जिजाऊ जीवन चरित्र, पुरूषोत्तम खेडेकर लिखित बालशिक्षण, जिजाऊंची शिकवण, तुकोबा ते शिवबा  ही प्रबोधनात्मक पुस्तके मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, पालवणचे माजी सरपंच परमेश्वर पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.

यावेळी संत तुकाराम महाराजांचे निस्सीम भक्त छगन रंदवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब रंदवे, पोलिस पाटील संजय मदने,प्रशांत ओहोळ, रमेश लोंढे व इतर शिक्षक उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version