समाज कल्याण विभागाच्या वतीने कोथळे येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पुरंदर, दि. ११ जून २०२० : पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रकाश भोईटे यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने पुरंदर तालुक्यातील कोथळे येथे गरजू व्यक्तीना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोथळे येथे आयोजित कार्यक्रमात वीस कुटुंबियांना हे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बाबाराजे जाधवराव मित्र परिवाराच्या वतीने यावेळी मास्क, सेनिटायजरचे वाटप करण्यात आले.

नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे यांच्या पुढाकारातून कोथळे ते जेजुरी रस्त्याचे डांबरीकरण, कोथळे येथे अंतर्गत रस्ते, हायमस्ट दिवे, ग्रंथालयांची इमारत, पुस्तके आदी विविध विकास कामे करण्यात आली असल्याचे यावेळी संदीप जगताप यांनी सांगितले.

या कार्यक्रमावेळी पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे, श्री मल्हार शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे, ग्राम पंचायत सदस्य वंदना जगताप, अभिजित जगताप, नीरा मार्केट कमिटीचे सदस्य एड. धनंजय भोईटे, गोविंद भोसले, शिवाजी जगताप, तुषार काकडे, दत्तात्रय भोईटे, प्रताप भोईटे, आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा