बारामतीत तृतीया पंथीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

बारामती, ०८ ऑगस्ट २०२०: शहरात सध्या कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळायची आहेत. यातच हातावरचे पोट असलेल्या तृतीयपंथीय हे शहरात पैसे मागून उदरनिर्वाह करतात, मात्र सध्याच्या परिस्थितीत ते शहरात फिरु शकत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

बारामती शहराच्या जवळ असलेल्या गुणवडी गावात असणाऱ्या तृतियपंथीयांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस रोहिणी खरसे यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून, यामध्ये गहु, तांदूळ,तेल,गरम मसाला भाजीपाल्यांचा समावेश आहे.

तृतीयपंथीय हे गावोगावी फिरून पैसे मागून पोट भरत असतात, मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांची उपासमार होते आहे व समाजात बऱ्याच लोकांना मदत मिळाली मात्र या उपेक्षित तृतीयपंथी यांना देखील मदत करणे गरजेचे आहे. आपणही समाजाचे देणे लागतो आणि या कोरोना महामारीच्या काळात आपल्याला माणुसकी जपत जमेल तेवढी मदत करणार असल्याचे रोहिणी खरसे यावेळी म्हणाल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा