गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा विजयसिंह चौधरी यांच्याकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

विजयसिंह चौधरी यांच्याकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

इंदापूर, दि.२८ मे २०२०: सध्या जगभरासह भारत देशामध्ये कोरोना ने हाहाकार माजवला आहे. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने २ महिन्यांहुन अधिक काळ टाळेबंदी केल्याने मोलमजुरी करणाऱ्या कामगारांचे हाल झाले आहेत. इंदापूर तालुक्यातील विशेषतः रोजंदारी करणाऱ्या ग्रामीण भागातील मजुरांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत होती.अश्यातच फुल ना फुलाची पाखळी म्हणून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून महाराष्ट्र प्रदेश एनएसयुआईचे माजी अध्यक्ष विजयसिंह चौधरी यांनी इंदापूर तालुक्यातील पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातील गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू दिल्या. जवळपास २०० हुन अधिक नागरिकांना या किट च्या माध्यमातून मदत केली. नागरिकांनी देखील चौधरी यांनी अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीसाठी त्यांचे आभार मानले.

यावाटप प्रसंगी उद्धव चौधरी, रणजित कदम, अक्षय भोसले, तुषार भोसले, सुरज पारेकर आणि अविनाश तुपे आदी युवकांनी सहकार्य केले.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

error: Content is protected !!
Exit mobile version