लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्ताने सामाजिक कार्य करण्याऱ्यांना ‘फकिरा’ चे वाटप.

5

पुणे, १० ऑगस्ट २०२०: पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज १ ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त व ९ ऑगस्ट क्रांतीदीना निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष मा. रमेशदादा बागवे यांच्या शुभहस्ते “फकिरा” हि कादंबरी देण्यात आली. त्यासोबत दोन किलो साखर देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन कसबा ब्लॉक काँग्रेसचे निरिक्षक अविनाशजी आडसुळ व युवानेते संदिपभाऊ लचके यांनी केले होते.

याप्रसंगी माजी नगरसेवक मुक्तारभाई शेख, जयसिंगजी भोसले, काँग्रेस व्यापारी सेल पुणे अध्यक्ष बाळासाहेब आमराळे, कसबा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रविण करपे, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे चिटणीस सुरेश कांबळे, कसबा ब्लॉक काँग्रेस उपाध्यक्ष बबलू कोळी, योगेशजी भोकरे, नरेशजी नलावडे, संदिप अटपाळकर, राहुलजी सुपेकर, प्रकाशदादा यादव, शिवाजी मेलकेरी व इतर मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा