बारामती,दि. २३ एप्रिल २०२०: कोरोना संसर्गामुळे मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांना संचारबंदी मुळे बाहेर पडता येत नसल्याने सध्या त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही गोष्ट लक्षात आल्यावर माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी या लोकांना भाजीपाला व अन्नधान्याची मदत केली आहे.
देशात कोरोनाच्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत अशातच हातावर पोट असणाऱ्या मजुरांची तर सध्या उपासमार सुरू आहे. बारामती शहरातील आमराई येथील प्रभाग क्रमांक १७ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील १०० कुटुंबांना जळोची येथे पर्यायी पुनर्वसन केलेल्या अशा एकूण ४८२ कुटुंबांना नगरसेवक बिरजू मांढरे यांनी काल बुधवार (दि.२२) भाजीपाला व अन्नधान्य
गव्हाचेपीठ, तांदूळ, गोडेतेल, साखर, तूरडाळ, साबण, मसाले, यांचे वाटप सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत करण्यात आले. यामध्ये ५० निराधार विधवा महिलांच्या घरात लहान मुलं असल्याने त्यांना जरा जास्तीची मदत करण्यात आली आहे.
काही दिवसापूर्वी देखील मांढरे यांनी अशीच मदत केली होती. ‘या लोकांची सध्याची परिस्थिती एवढी अडचणीची आहे की यांच्याकडे गहू दळायला देखील पैसे नाहीत त्यामुळे आम्ही यांना गव्हाचे पीठ देतो आहे ‘ , असे नगरसेवक बिरजू मांढरे यांनी सांगितले. मांढरे यांनी केलेल्या मदतीची येथील नागरिकांनी आणि महिलांनी कौतुक केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल यादव