कदमवाकवस्ती मध्ये गरजू नागरिकांना अन्न-धान्य वाटप

चित्तरंजन नाना गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने एक हात मदतीचा…

कदमवाकवस्ती : केंद्र व राज्य सरकारने मे व जून महिन्यासाठी प्रती व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ प्रत्येकी ८ व १२ रुपये किलो या दराने देण्याचे घोषित केले आहे. या धान्याचे वाटप आज सकाळी आठ वाजता पालखी स्थळ कदमवाक वस्ती याठिकाणी सु नियोजितपणे चालू करण्यात आले आहे.

लॉक डाऊन च्या काळामध्ये हातावर पोट असणाऱ्या गोर-गरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्या नागरिकांना आज धान्य खरेदी करण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत अशा गरजू नागरिकांनसाठी मित्र परिवाराच्या वतीने एक हात मदतीचा म्हणून गोर-गरीब नागरीकांना धान्य खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च करण्यात आला आहे.व तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या आसपासच्या गरजू नागरिकांपर्यंत ही माहिती पोचवा व नागरिकांनी धन्याच्या ठिकाणी गर्दी करू नये सर्वाना धन्य दिले जाईल असे नागरिकांना आव्हान केले.

वाटपाच्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आपणास मार्गदर्शन करतील व सोशल डिस्टन्स ठेऊन सहकार्य करावे व नागरिकांनी सुद्धा त्यांना योग्य ते सहकार्य करावे व काही गरज भासल्यास किंव्हा अडचण भासल्यास कदमवाकवस्ती ग्रामपंचायत मध्ये संपर्क करा व एकीकडे गोर- गरीब लोकांना अशी मद्दत करत असताना मात्र काही लोक राजकरण सुद्धा करत आहेत.व वरिष्ठ अधिकारी यांच्या बळाचा वापर करून व फोन करून दबाव टाकण्याचा ही प्रयत्न करत आहेत.व गरिबांना जर मदत करणं गुन्हा असेल तर माझ्यावर F I R दाखल करा. असे त्यांनी न्यूज अनकट शी बोलताना सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा