अंथुर्णे येथे गरजूंना अन्नधान्याचे वाटप

बारामती, दि.२मे २०२०: कोरोनामुळे लागू झालेल्या संचारबंदी व लॉकडाऊनमुळे मजूर व गोरगरीब तसेच ज्यांचे खरेच काम केल्याशिवाय हातात पैसा येत नाही अशा स्तरातील कुटुबांचे खुप हाल होत आहे. अंथुर्णे (ता.इंदापूर) येथील गोविंद ट्रेडींग कंपनीकडून १०० कुटूबांना पाच क्विंटल धान्य मोफत देण्यात आले.

येथील अत्यंत गोरगरीब कुटुंबांना अन्न धान्य वाटप करताना या कंपनीचे सर्वेसर्वा सचिन दळवी म्हणाले की, महाराष्ट्रतील प्रत्येक तरुण मराठी उद्योजकाने जर ठरवलं तर अशा कोरोनासारख्या आजाराच्या संकट काळात महाराष्ट्रतील एक ही गरीब कुंटुब उपाशी राहणार नाही. तसेच प्रत्येक छोटया मोठ्या उद्योजकांनी आपल्या जवळील आसपासच्या परिसरातील संकटात सापडलेल्या फक्त १० कुंटुबांना मदत केली तर कोणीच उपाशी राहू शकत नाही असे आवाहन केले.

यावेळी गोविंद ट्रेडिंग कंपनीचे सचिन दळवी , गोविंद दळवी, वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक दिलीप पवार, प्रकाश माने, सरपंच मालन पवार, उपसरपंच दादा झणझणे, राहुल कुंभार, अमर सोनवणे , शरद दळवी, राजाराम गवळी इत्यादी उपस्थित होते .

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा