गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा ग्रामपंचायतींना मोफत सॅनिटायझरचे वाटप

ग्रामपंचायतींना मोफत सॅनिटायझरचे वाटप

बारामती, २५ एप्रिल २०२० : बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या ग्रामपंचायतींकडून गावपातळीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मदतीचा हात म्हणून बारामती तालुक्यातील एकुण १७ ग्रामपंचायतींना गावपातळीवर निर्जंतुकीकरण करण्यासाठी मोफत सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे.
ज्ञानज्योत कला क्रीडा चॅरिटेबल ट्रस्ट ढेकळवाडी व रविराज अग्रो बारामती, यांच्या माध्यमातून, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी, बारामती तालुक्यातील एकुण १७ ग्रामपंचायतींना मोफत सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. गावच्या लोकसंख्येनुसार गावांतील वाड्या वस्त्यांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी एकुण १ हजार लिटर सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
ज्ञानज्योत कला क्रीडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजित तानाजी सस्ते, उपाध्यक्ष विक्रम सुनिल थोरात, कार्याध्यक्ष डॉ. किशोर मोहनराव साळुंके, सचिव सचिन जाधव यांनी मोफत सॅनिटायझरचे वाटप केले आहे. याबाबत सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ज्ञानज्योत कला क्रीडा चॅरिटेबल ट्रस्ट व रविराज अग्रो बारामती यांचे आभार व्यक्त केले.

न्यूज अनकाट, बारामती प्रतिनिधी- अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version