पिंपरे खुर्द येथे ऑनलाईन आभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब’चं वाटप

पुरंदर, ६ ऑक्टोंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द येथील ‘बाबलाल काकडे माध्यमिक विद्यालया’तील विद्यार्थ्यांना काल ऑनलाईन आभ्याास करता यावा म्हणून ४८ टॅब’चं वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन टॅबचे वाटप करीत असल्याचे निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी यावेळी सांगितलं.

ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल नसल्यानं विद्यार्थी आत्महत्या करीत असतानाच आता निंबूत येथील ग्राम विकास प्रतिष्ठान, ज्युबीलंट फाऊंडेशन व अक्षय शिंदे फाउंडेशनच्यावतीनं गरजु होतकरु विद्यार्थ्यांना मोफत ४८ टॅब’चं वाटप करण्यात आलं. टॅब’चं वाटप संस्थेचे अध्यक्ष सतिश काकङे यांच्या हस्ते करण्यात आलं.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद थोपटे हे होते. यावेळी भिमराव बनसोङे, पिंपरे गावचे, माजी उपसरपंच मोतीभाऊ थोपटे, राजेंन्द थोपटे, पोलिस पाटील सौ. रुपाली सोनवणे, शाळा समिती अध्यक्ष बाळासाहेब थोपटे, तसेच तंटामुक्ती अध्यक्ष बाळासो थोपटे तसेच ग्रामस्थ व पालक उपस्थिती होते. या कार्यक्रमाचं सुञसंचालन उपशिक्षक अमोल शिंदे यांनी केलं व प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक नेवसे कैलास यांनी केलं आणि आभार अनिल झगडे यांनी मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा