गोल पोस्ट महाराष्ट्र प्रतापसिंह जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कुर्डूवाडी येथे फळे व खाऊचे वाटप

प्रतापसिंह जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कुर्डूवाडी येथे फळे व खाऊचे वाटप

माढा, ५ नोव्हेंबर २०२०: पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त कुर्डूवाडी प्रेस क्लबच्या वतीने उम्मीद या एड्स बाधीत मुलांच्या शाळेतील मुलांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले.

कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चिमणाजी केंद्रे मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव निलेश देशमुख, सोलापूर जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष हर्षद मोरे, कुर्डूवाडी प्रेस क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास बागडे, सतिश महिंगडे, वसंत कांबळे, अनिल कांबळे, महेश वाळुंजकर, बाबाफरीद पठाण, संतोष वाघमारे यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच मुकबधीर शाळेला रोख स्वरुपातही मदत करण्यात आली. यावेळी पत्रकार विनायक पाटील यांनी सर्व उपस्थित पत्रकारांचे आभार मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version