राकेश वाल्मिकी यांच्याकडून फळ व पालेभाज्या वाटप

बारामती, दि.१३ मे २०२०: सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे त्यामुळे श्रमिक व गरजवंतांना हाताला काम नाही. यासाठी आपण समाजाचे देणे लागतो. या जाणिवेतून बारामती शहरातील राकेश वाल्मिकी व अभिनव दहीहंडी संघ यांच्या वतीने बारामती शहरामध्ये पालेभाज्या व फळभाज्यांचे आमराई परिसरातील गोरगरीब व श्रमिक लोकांना वाटप करण्यात आले.त्यामुळे मोठा आधार मिळाल्याची प्रतिक्रिया या नागरिकांनी दिली आहे.

बारामती शहरातील सतत सामाजिक व क्रीडा क्षेत्रात काम करत असलेल्या अभिनव दहीहंडी संघाचे अध्यक्ष राकेश वाल्मिकी यांच्या पुढाकाराने आज सगळीकडे कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. गोरगरीब लोकांच्या हाताला काम नसल्याने त्यांची उपासमार सुरू आहे. या गरजू लोकांना मदत म्हणून वाल्मिकी यांनी बारामती शहरातील वेगवेगळ्या परिसरात गरजू ७०० कुटुंबियांना पालेभाज्या व फळभाज्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले. यामध्ये कांदा , बटाटा , टोमॅटो , कारले ,फ्लॉवर , मिरची , गवार , कोबी , शेवगा , शिमला मिरची , भेंडी ,वांगी या पालेभाज्यांचा समावेश आहे. या भाज्या आठ दिवस पुरेल असा पुरवठा करण्यात आला होता.

आमराई परिसरातील प्रभाग क्र.१७ मधील वडकेनगर , प्रबुद्धनगर, बुरूड सोसायटी व प्रभाग क्र.१८ बारामती बस स्थानकासमोरील परिसर, दादासोनगर ,भोईटे हॉस्पिटल जवळ परिसरातील (७००) कुटुंबियांना घरोघरी जाऊन भाजीपाल्याचे वाटप करण्यात यावेळी सॅनिटायजर ,मास्क व सोशल डिस्टेन्सच्या नियमाचे पालन करण्यात आले.वाल्मिकी यांच्या कार्याचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होते आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा